लाडकी बहीण योजना : आता मिळणार 4500 रुपये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मोठी घोषणा

Ladki Bahin yojana form : लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये सरकार जमा करणार आहे.

पुढच्या महिन्यामध्ये ज्या महिला अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे म्हणजे 4500 एकदाच खात्यामध्ये जमा होणार आहेत. अशी घोषणा नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली.

परंतु 17 ऑगस्टला फक्त 3000 रुपयेच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ज्या महिला या हप्त्यापासून वंचित राहतील आणि त्या महिला पुढच्या महिन्यांमध्ये नवीन अर्ज करतील अशांच्या खात्यामध्ये सर्व तीन हप्ते एकदाच जमा होतील म्हणजेच 4500 रुपये जमा होतील.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा⬇️⬇️

आता ह्या दोन अटी नक्की कोणकोणत्या आहेत ते समजून घ्या.

  • पहिली अट म्हणजे तुमचा फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत (अप्रू ) मंजूर झालेला असेल तरच हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लाडकी  बहीण योजनेचा फॉर्म हा 14 ऑगस्टपर्यंत मंजूर होणे आवश्यक आहे.
  • आता दुसरी अट काय आहे दुसरी अट त्यामध्ये सांगितलं आहे की तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग (लिंक) असणं गरजेचं आहे. तुमच आधार कार्ड बँकेला सीडींग असेल तरच तुम्हाला 3000 रुपये मिळतील.

 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा

Leave a Comment